दिग्गज खेळाडूंना डच्चू; रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ‘या’ तीन खेळाडूंना केलं  रिटेन

मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने IPL लिलावापूर्वी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या संघाने IPL 2021 संघात विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटाला ठेवले आहे .

मागील आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स टीम चौथ्या स्थानावर होती. सीझन संपण्यापूर्वी, कोहलीने घोषणा केली की 2021 ही त्याची आरसीबीचा कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा असेल. IPL 2021 च्या काही आठवड्यांनंतर, एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.RCB ला त्यांच्या तीन कायम ठेवलेल्या खेळाडूंना IPL 2022 साठी अंतिम ठरवण्यापूर्वी खूप विचार करावा लागला. IPL 2021 चा सर्वात मौल्यवान खेळाडू हर्षल पटेलला कायम ठेवण्याची अनेकांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही.

लेग-स्पिनर युझवेंद्र चहल आणि सलामीवीर देवदत्त पडिक्कल. दोन्ही खेळाडूंनी मागील हंगामात आरसीबीसाठी अपवादात्मक कामगिरी केली होती, परंतु दोघांनाही कायम ठेवण्यात आले नाही. आयपीएल लिलाव 2022 मध्ये आरसीबीने त्यांना परत विकत घेण्याचा प्रयत्न करेल असे सांगण्यात येत आहे.