Ganeshostav : विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये पर्यावरण पुरक झिरो बजेट गणेशोत्सवाचे आयोजन

Vidyarthi Sahayyak Samiti : सर्वञ गणेशोत्सव (Ganesh Festival) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.पुण्यातील विद्यार्थी साहाय्य्क समिती मधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा गणेशोत्सव ‘झीरो बजेट’ असतो.परिसरातील टाकाऊ वस्तू यासाठी उपयोगात आणल्या जातात.

मुलांच्या लजपतराय विद्यार्थी वसतिगृहात,मुलींच्या आपटे वसतिगृहात तसेच सुमित्रासदन वसतिगृहात हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. या तिन्ही वसतिगृहातील गणेशोत्सवात यंदा भारताची चंद्रयान -३ अवकाशातील यशस्वी मोहीम आकर्षक देखाव्यातून मांडण्यात आली आहे.

कागदाच्या पुठ्यापासून तसेच वसतिगृह परिसर कुंड्यातील मातीपासून बनवलेली गणेशाची सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
सजावटीच्या आजुबाजुला भारताच्या यशस्वी अवकाश मोहिमेत योगदान दिलेल्या शास्त्रज्ञाचे फोटो लावण्यात आले आहेत.

ज्ञानसत्र’ अंतर्गत विविध सामाजिक,शैक्षणिक, व्यावसायिक योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे,तसेच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास घडवणाऱ्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तिन्ही वसतिगृहाचे पर्यवेक्षक, समितीचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य,मार्गदर्शन केले.

समितीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण पुरक झिरो बजेट गणेशोत्सव. गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक जाणिवेची संकल्पना घेऊन विद्यार्थी हा उत्सव साजरा करतात. यात कुठेही धार्मिकतेचा अवडंबर नसतो, तर तो ज्ञानसत्र म्हणून साजरा केला जातो,
वसतिगृहातील बागेच्या परिसरातील मातीपासून विद्यार्थ्यांनी तयार केला गणपती, सजावटीसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या ओढण्या, नैसर्गिक रंग कलात्मक कृतीतून केलेली सजावट आणि त्याला वैचारिक विचारांची जोड देत ज्ञानसत्राचे आयोजन हेच या गणेशोत्सवाचे वेगळेपण आहे.

– तुषार रंजनकर
(विद्यार्थी साहाय्यक समिती कार्यकारी विश्वस्त )

समितीच्या गणेशोत्सवाचे एक वेगळेपण आहे पुण्यात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा उत्सावातुन वैचारिक विचारांच मंथन घडावे यासाठी ज्ञानसञाचे आयोजन करण्यात येत. विद्यार्थी या उत्साहात सामिल होत दरवर्षी दर्जेदार नवीन संकल्पना घेऊन वेगवेगळ्या स्वरूपात विचारांचा ठेवा जपत सामाजिक जागृतीचा संदेश उत्सवातून दिला जातो. "समिती गणेशोत्सव म्हणजे उर्जा देणारा एक सोहळा असतो;’समितीचा माजी विद्यार्थी असुन गणेशोत्सवात सामिल होताना कायमचं आनंद अनुभवायला मिळतो.

– लक्ष्मण जाधव
(समिती माजी विद्यार्थी)

ज्ञानाची देवता म्हणून ओळख असलेल्या गणरायाचा उत्सव विद्यार्थी साहाय्यक समिती मध्ये ज्ञानसत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारी प्रेरणादायी विचारांची शिदोरी ही एक पर्वणीच असते.
समिती मधील गणेशोत्सव म्हणजे एकमेकांमध्ये सहकार्याची, सदाचाराची, स्नेहाची भावना दृढ करण्याचा उत्सव असतो.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती