Govt Scheme :  प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना कशी करता येईल?

योजनेच्या अटी

• सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
• प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे कागदपत्रे, जमीन अतिक्रमण विरहित असावी, जमीन भाडेपट्टीवर असल्यास त्याचा कालावधी १० वर्षापेक्षा कमी नसावा.
• बँक अथवा वित्तीय संस्थेने  बिगर अनुदानाच्या भागासाठी कर्ज देण्यासाठी मान्यता देणे आवश्यक किंवा स्वतः गुंतवणूक करणार असल्याचे घोषणापत्र.
• मत्स्यबीज उत्पादन केंद्राची क्षमता कमीत कमी १५ दशलक्ष मत्स्यबीज, वर्ष, उत्पादन केंद्र किंवा ६ कोटी मत्स्यजीरे, वर्षं, उत्पादन केंद्र असावी, प्रकल्प कमीत कमी ०.५ हेक्टर जागेमध्ये असावा.
• मत्स्यबीज उत्पादन केंद्रामध्ये मत्स्य प्रजनक साठवणूक,  संगोपन संवर्धन तलाव, लहान प्रयोगशाळा, पाणी व विद्युत पुरवठा तसेच आवश्यक पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे.
• मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे व्यवस्थापन तांत्रिक कर्मचाऱ्याकडून करणे आवश्यक.

योजनेअंतर्गत लाभ
२५ लाखाच्या प्रकल्प किंमतीस सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४० टक्के अनुदान अर्थात १० लाख रुपये व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला यांच्यासाठी ६० टक्के अनुदान अर्थात १५ लाख रुपये.

अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय तसेच जिल्हास्तरीय सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या  कार्यालयाशी संपर्क साधावा