Gujarat Titans | तो गोलंदाज आम्ही घडवलाय; मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर शुबमन गिलने या खेळाडूचे कौतुक केले

Gujarat Titans | रविवारी झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सला 6 धावांनी पराभूत केले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकांत 6 विकेटमध्ये 168 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, 9 विकेट गमावल्यानंतर मुंबई संघ 162 धावा करू शकला.

शुबमन गिलने गोलंदाजांचे कौतुक केले
गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) विजयामुळे उत्साहित, शुबमन गिल याने आपल्या फिरकीपटूंचे कौतुक केले आणि तो म्हणाला, “ज्या प्रकारे गोलंदाजांनी धैर्य गमावले नाही आणि शेवटच्या षटकांत गोलंदाजी केले, ते विशेष होते. मैदानावर दव असतानाही चांगली गोलंदाजी करत आमच्या फिरकीपटूंनी सामना आमच्या बाजूने वळवला.”

गिलने आपल्या अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माचे कौतुक केले, ज्याने चमकदारपणे गोलंदाजी करताना दोन विकेट घेतल्या. गुजरातचा कर्णधार म्हणाला, “गेल्या वर्षी मोहित शर्मा आमच्या ताफ्यात सामील झाला होता. त्याला आम्ही घडवले आहे. तो आपला चांगला फॉर्म सुरू ठेवेल अशी अपेक्षा आहे. आम्हाला फक्त विरोधी संघाला दबावात ठेवायचे होते. दबाव निर्माण करण्याची आणि त्यांची चूक होण्याची प्रतीक्षा करण्याची योजना होती.”

आम्ही 10-15 धावा कमी केल्या: गिल
या व्यतिरिक्त गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने सांगितले की त्याचा संघ फलंदाजीत कमी पडला, गुजरातने 168 धावा केल्या असल्या तरीही असे वाटते की 10-15 धावा जास्त करायला पाहिजे होत्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार