Hardik Pandya | अखेर बॉस कोण पांड्यानं दाखवून दिलं…. रोहित शर्माला थेट बाउंड्रीवर पाठवलं

Hardik Pandya, Rohit Sharma | इंडियन प्रीमियर लीग २०२४चा चौथा हा रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या हाय व्होल्टेज सामन्यात गुजरातने मुंबईला ६ धावांनी पराभूत केले. या सामन्यादरम्यान मुंबईचा नवखा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यावर जोरदार टीका झाली. संपूर्ण स्टेडियममध्ये चाहते त्याला ट्रोल करताना दिसले.

या हंगामात आयपीएलसाठी, मुंबईने रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन काढून टाकले आणि हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघाचा नवीन कर्णधार म्हणून निवडले. चाहत्यांना मुंबई संघाचा हा निर्णय अजिबात आवडलेला नाही. त्याच वेळी, मुंबईच्या गोलंदाजीच्या वेळी, हार्दिकने रोहितबरोबर असे काम केले, ज्यामुळे चाहत्यांचा राग आता शिखरावर आहे.

हार्दिकने रोहितला फील्डिंगसाठी पाठविले
मुंबईच्या गोलंदाजीवेळी नवीन कर्णधार हार्दिक माजी कर्णधार रोहित शर्मा याला क्षेत्ररक्षणासाठी सूचना देताना दिसला. त्याने रोहित शर्माला ३० यार्ड सर्कलच्या कक्षेत उभे राहून सीमेवर क्षेत्ररक्षण करण्यास पाठविले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. हार्दिकने रोहितला जेव्हा सीमेवर क्षेत्ररक्षणासाठी जाण्याची सूचना दिली, तेव्हा रोहित ‘नक्की मीच जाऊ का?’ अशी विचारणा करताना दिसला.

खरं तर, गुजरात टायटन्सच्या डावात शेवटचे षटक (२०) मुंबई इंडियन्समधून जेराल्ड कोएत्झी टाकत होता. या षटकादरम्यान, हार्दिक गोलंदाजासह एकत्रितपणे मैदान सेट करीत होता. अशा परिस्थितीत, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक रोहित शर्माला ३० यार्ड वर्तुळात उभे राहून सीमेलगत क्षेत्ररक्षणासाठी जाण्यासाठी सांगत आहे. बर्‍याचदा सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करणारा रोहित लाँग ऑनवर जाताना दिसतो. सीमेवर गेल्यानंतरही पांड्याने रोहितला त्याच्या जागेवरून २-३ वेळा हलवले. चाहत्यांना हार्दिकचे रोहितबरोबर असे वागणे अजिबात आवडले नाही. यामुळे पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार