Banana Kulfi Recipe | उन्हाळ्यात घरच्या घरी बनवून खा केळी कुल्फी, रेसिपी नोट करुन घ्या

Banana Kulfi Recipe  | उन्हाळा म्हटलं की, खवय्यांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी आईस्क्रीमचं चित्र उभं राहतं. कडाक्याच्या उन्हात थंडगार आईस्क्रीम फक्त जिभेची चवच प्रफुल्लीत करत नाही, तर मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातं. बाहेरून आवडती आईस्क्रीम किंवा कुल्फी (Banana Kulfi Recipe ) आणून खायला सर्वांना आवडतं. पण घरीही तुम्ही केळीची कुल्फी बनवू शकता.

साहित्य:
२ कप दूध
१ कप दूध (गोड)
२ केळी (चिरलेली)
१/२ कप क्रीम
१ चमचा वेलची
एक चिमूटभर केशर
१/२ कप साखर
१ चमचा ड्राय फ्रूट्स

केळी कुल्फी कशी बनवायची:
– सर्वप्रथम दूध, केळी, साखर आणि केशर एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
– ते पातळ होईपर्यंत बारीक करा.
– आता केळीच्या मिश्रणात क्रीम, वेलची आणि केशर मिक्स करून पुन्हा बारीक करा.
– मिश्रणात क्रीम चांगले मिसळेपर्यंत बारीक करा.
– यानंतर केळीच्या मिश्रणात ड्रायफ्रुट्स मिक्स करून कुल्फीच्या साच्यात किंवा छोट्या भांड्यात ठेवा.
– आता मोल्ड किंवा वाट्या ॲल्युमिनियम फॉइलने झाकून कुल्फी सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवा.
– केळी कुल्फी तयार आहे. ती गोठल्यानंतर फ्रीजरमधून बाहेर काढा आणि प्लेट किंवा भांड्यात सर्व्ह करा.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार