पाठबाईंचा नवरा राजकारणात; गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर केला ‘या’ पक्षात केला प्रवेश

गेल्या काही महिन्यात मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे. आता याच यादीत आणखी काही नावांची भर पडली आहे. मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर  हिच्यासोबतच माधव देवचक्के, हार्दिक जोशी (Hardeek Joshi), अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांनी शिंदे गटात प्रवेश (Eknath Shinde Shivsena) केला आहे.

काल गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिव चित्रपट सेनेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अनेक कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं आहे.

काही वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता सिनेसृष्टीतल्या कलाकारांसाठी काम करण्याची वेळ आली आहे, असं हार्दिकनं यावेळी म्हटलं आहे. तर आपल्या माणसांसाठी काम करायचं असेल, लढायचं असेल तर आपल्या लोकांची साथ हवीच. एकनाथ शिंदे साहेब असे नेते आहेत, की ते कधीही आपलं म्हणणं ऐकून घेऊ शकतात. आम्ही सगळे एकत्र नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू, असं अदिती सारंगधर हिनं म्हटलं आहे.