एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांना मिळणार ‘हे’ खातं? इतर ९ नेत्यांवरही असतील जबाबदाऱ्या

विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचा एक गटही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर आता अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या ९ नेत्यांकडे मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेगवेगळी खाती सोपवली जातील. अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसुल खातं दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सांस्कतिक मंडळ, छगन भुजबळ यांना ओबीसी आणि बहुजन विकास खातं, हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक आणि कामगार, धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक विभाग, अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग, धर्मराव अत्राम यांच्याकडे आदिवासी विभाग, संजय बनसोडे यांच्याकडे क्रिडा व युवक कल्याण, अनिल पाटील यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.