मुंबई इंडियन्सची गचाळ कामगिरी सुरूच; आता अर्जुन तेंडूलकरला संधी देण्याची होतेय मागणी

मुंबई : यंदाच्या सिझनमध्ये मुंबईच्या टीमला अजून एकंही विजय नोंदवता आलेला नाही. 5 सलग पराभवानंतर मुंबईच्या टीमवर टीका करण्यात येत आहेत. सध्याच्या परिस्थितीत टीममध्ये दिग्गज खेळाडू आहेत, मात्र हे दिग्गज खेळाडू फेल झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई टीमने 30 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. विशेष म्हणजे IPL 2021 मध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अर्जुनचा टीममध्ये समावेश करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

अर्जुन तेंडुलकर आता 22 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे तो अष्टपैलू खेळाडू आहे. यंदा मुंबईची गोलंदाजी सुमार दर्जाची झाली असून अर्जुनसारख्या अष्टपैलू खेळाडूला संधी दिल्यास फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्हीकडे फायदा होऊ शकतो. यापूर्वी मुंबईच्या फॅन्सने अर्जुनला मुंबईच इंडियन्सच्या टीममध्ये सामाविष्ट करण्याची मागणी केली होती.