आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली कंटाळा आला नाही का ? शरद पवारांना खोत यांचा सवाल 

सांगली – सांगलीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला आहे. खासदार शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. आता पडळकर यांच्यासोबत माजी  सदाभाऊ खोतही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहेत.

मेंढपाळाच्या हस्तेच लोकार्पण सोहळा व्हायला हवा, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली असून धनगर समाजाचा देखील पडळकर याना पाठींबा मिळताना दिसत आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको, त्यातर इतर स्थानिक नेत्यांची नावं वगळ्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली कंटाळा आला नाही का ? असा  सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना केला आहे.

आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार, कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी उद्घाटन होणारच अशी ठाम भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पुतळ्याचा वाद पेटला आहे.