गरोदरपणात उसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, पण घ्यावी ‘ही’ खबरदारी

गरोदरपणात महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाची लालसा जाणवते. परंतु गरोदरपणात निरोगी राहण्यासाठी काहीही खाण्यापूर्वी त्याबाबत योग्य माहिती असणे गरजेचे आहे. कारण गरोदरपणात तुमचा आहार मुलाची वाढ आणि विकास ठरवतो. बहुतेक गरोदर स्त्रिया उसाच्या रसाबद्दल संभ्रमात असतात, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, गरोदरपणात उसाच्या रसाचे सेवन सुरक्षित आहे, तसेच खूप फायदेशीरसुद्धा आहे. (Benefits Of Sugarcane Juice During Pregnancy)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात गोडाच्या लालसेवर मात करण्यासाठी उसाचा रस हा आरोग्यदायी आणि पौष्टिक पर्याय आहे. उसाच्या रसामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, सॉल्युबल फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. चला जाणून घेऊया गरोदरपणात उसाचा रस पिण्याचे आरोग्याला होणारे फायदे…

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर: momsjunction.com नुसार, बहुतेक गर्भवती महिला अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असतात, उसाच्या रसाचे सेवन बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास आणि पोट साफ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. उसाच्या रसाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो.

ऊर्जा वाढवण्यास उपयुक्त: गर्भधारणेदरम्यान ऊर्जा खूप कमी होते, अशा परिस्थितीत एक ग्लास ताज्या उसाच्या रसाचे सेवन त्वरित ऊर्जा वाढवण्याचे काम करू शकते. एक उत्तम ऊर्जा बूस्टर असण्यासोबतच, उसाचा रस शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

रोगप्रतिकार शक्ती होते मजबूत: उसाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच गर्भधारणेदरम्यान सर्दी, संसर्ग आणि फ्लू यांसारख्या समस्यांशी लढतात आणि यकृताचे आरोग्य सुधारतात. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आवश्यक आहे.

गरोदरपणात उसाचा रस पिताना ही खबरदारी घ्या-

  • गरोदरपणात उसाच्या रसाचे सेवन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे, परंतु ते योग्य प्रमाणात आणि मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.
  • मधुमेहाच्या समस्येमध्ये उसाचा रस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पिऊ नये, गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उसाचे सेवन करावे.
  • गरोदरपणात उसाचा रस पिताना स्वच्छतेची आणि घटकांची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, फक्त ताजे रस प्या.