जय शाह यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा सन्मान; स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित

अतुलनीय नेतृत्व आणि भारतीय खेळांवरील परिवर्तनात्मक प्रभाव यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे सचिव  जय शाह(Secretary of the Board of Control for Cricket in India Jai Shah)  यांना सीआयआय स्पोर्ट्स बिझनेस अवॉर्ड्स २०२३ मध्ये प्रतिष्ठित स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. टाटा स्टीलचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सीआयआय नॅशनल कमिटी व स्पोर्ट्सचे चेयरमन श्री. चाणक्य चौधरी यांनी भारतीय क्रिकेटला अभूतपूर्व उंची गाठून देण्यात श्री जय शाह यांनी निभावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत हा पुरस्कार प्रस्तुत केला. खेळाची उंची वाढवण्याबरोबरीनेच क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवा आकार ज्यामुळे दिला गेला अशा क्रांतिकारी कामगिरीसाठी हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.

जय शाह यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, नुकतीच पार पडलेली आयसीसी मेन्स वर्ल्ड कप स्पर्धा ही आजवरची सर्वाधिक प्रेक्षक लाभलेली विश्व कप स्पर्धा ठरली आहे. यातून श्री शाह यांची धोरणात्मक कौशल्ये आणि संघटनात्मक पराक्रम दिसून येतो. या स्पर्धेला मिळालेल्या उत्तुंग यशाने जगभरातील क्रिकेट रसिकांची मने जिंकली, इतकेच नव्हे तर, जागतिक क्रिकेटिंग पॉवरहाऊस म्हणून भारताचे स्थान देखील मजबूत केले.

शाह यांच्या नेतृत्वाखाली घडून आलेली सर्वात उल्लेखनीय प्रगती म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये वेतन समानता. अनेक अडथळ्यांवर मात करत, ही समानता मिळवून देत, श्री शाह यांनी हे सुनिश्चित केले की पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मोबदला मिळेल. यामुळे भारतीय खेळांच्या क्षेत्रात एक आदर्श बदल झाला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा निष्पक्षतेप्रती बांधिलकी दर्शवतो, इतकेच नव्हे तर सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देऊन, महिला खेळाडूंच्या अफाट प्रतिभा आणि समर्पणाचा सन्मान करतो.

जय शाह यांचा आणखी एक प्रशंसनीय उपक्रम म्हणजे महिला प्रीमियर लीगच्या स्थापनेचे नेतृत्व होय. या क्रांतिकारी स्पर्धेने देशातील सर्वोच्च महिला क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ प्रदान केले आहे. हा उपक्रम केवळ क्रीडा क्षेत्रातील लिंगभेद दूर करत नाही तर क्रिकेटच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टता वाढवण्याची भारताची वचनबद्धता दृढ करतो.

शिवाय, आयसीसी ऑलिम्पिक वर्किंग ग्रुपचे प्रेरणास्थान म्हणून श्री जय शाह यांच्या प्रभावशाली भूमिकेने क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जागतिक स्तरावर या खेळाचा विस्तार करण्याप्रती त्यांची बांधिलकी यामधून दिसून येते. या धोरणात्मक सहभागामुळे क्रिकेटच्या वृध्दीप्रती श्री शाह यांची वचनबद्धता दर्शवली जात आहे, तसेच जागतिक स्तरावर या खेळाच्या भविष्याला आकार देणारी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून स्थान त्यांना लाभले आहे.

स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर हा श्री जय शाह यांना प्रदान करण्यात आलेला सन्मान त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, गतिमान दृष्टीकोन आणि भारतीय क्रिकेटला अभूतपूर्व उंचीवर नेण्याप्रती अटल वचनबद्धता दर्शवतो. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने क्रिकेट विश्वात परिवर्तन घडवून आणण्याबरोबरीनेच जागतिक स्तरावर क्रीडा प्रशासनातील उत्कृष्टतेचा मानदंडही स्थापित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki