हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मिळाला 43 कोटी रुपयांचा निधी

12 कोटी रुपयातून होणार ताडाळी- येरुर- पांढरकवडा - धानोरा मार्गाचा विकास

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या  पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 43 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतील 12 कोटी रुपये ताडाळी- येरुर – पांढरकवडा-धानोरा मार्गाच्या विकासासाठी खर्च केल्या जाणार आहे.

पुढील पंधरा दिवस सदर अधिवेशन चालणार आहे. या अधिवशेनात चंद्रपूर मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याच्या दिशने आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न असणार आहे. सदर अधिवेशनात मतदार संघातील विविध विषंयाकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान अधिवशेनाच्या पहिल्या दिवशी प्रकाशित आलेल्या पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघातील विविध विकासकामांसाठी 43 कोटी रुपये देण्यात आले आहे. या निधीतील 12 कोटी रुपये ताडाळी- येरुळ- पांढरकवडा- धानोरा मार्गाचा विकासकामासाठी खर्च केल्या जाणार आहे. साखरवाही – येरुर – वांढरी एमआयडीसी – दाताळा – चंद्रपूर या मार्गाचे सिमेंट काँक्रीट चौपदरीकरण करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर याच मार्गाच्या सौंदर्यीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी सदर पुरवणी यादीत मंजुर करण्यात आला आहे.

बंगाली कॅंम्प चौक ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मार्गावर नाली आणि पेविंग ब्लॉक कामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हातारदेवी ते वढा दरम्यान लहान पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटी 12 लक्ष रुपयांचा निधी सदर पूरवणी यादीत मंजूर करण्यात आला आहे. तर पुर्वी मंजूर असलेल्या कामासाठी 1 कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधीतून मतदार संघाच्या विकासकामांना गती मिळणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki