एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? मला जास्त बोलायला लाऊ नका – गिरीश महाजन  

जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध संपताना दिसत नाही. हा वाद इतक्या टोकाला पोहचला की आता एकनाथ खडसेंच्या मुलाचं नेमकं काय झालं? ही हत्या होती की आत्महत्या हादेखील संशोधनाचा विषय आहे असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे.  (How did Eknath Khadse’s son die? )

गिरीश महाजन यांना मुलगा असता तर तोही राजकारणात असता, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाला गिरीश महाजनांनी आज प्रत्युत्तर दिलं. यावेळी महाजनांनी एकनाथ खडसे यांना एक मुलगा होता. त्यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? हे तपासण्याची गरज आहे, असं विधान केलं.

“एकनाथ खडसे यांनी परवा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही सुदैवाने गिरीश महाजनांना मुलगा नाही, असं वक्तव्य केले. मला दोन मुली असून मी त्यांना राजकारणात आणलेलं नाही. मला त्याचा आनंद आहे. पण माझा खडसेंना प्रश्न आहे की त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं? याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे”, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला.