क्रूर शिक्षिकेने लोखंडी रॉडने ८० विद्यार्थ्यांना दिला मार, घायळ विद्यार्थींनी पुढे केलं असं काही

Crime News: डोंबिवली, महाराष्ट्र येथे स्थित S.H. जोंधळे विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकवणाऱ्या गणिताच्या शिक्षिकेबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केली असता संतप्त शिक्षिकेने त्यांना बेदम मारहाण केली. ही बाब उघडकीस येताच पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातला आणि शिक्षिकेवर कडक कारवाईची मागणी केली. पोलिसांनी शिक्षिकेवर शाळेतील 80 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शाळा प्रशासनाने शिक्षिका नीलम भारमल यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा गोंधळ थांबला. गणितात कमकुवत असलेल्या पाचवी आणि सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षिकेने बेदम मारहाण केली, अनेक मुलांच्या मानेवर आणि हाताला जखमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. काही मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. जखमी मुले आपापल्या घरी पोहोचल्यावर पालकांचा संताप गगनाला भिडला.

शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी करत पालकांनी शुक्रवारी शाळेच्या आवारात गोंधळ घातला. पालकांचा संताप पाहून मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षिकेला निलंबित केले आहे. पालकांनी शिक्षिकेविरुद्ध विष्णू नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिक्षिकेविरुद्ध भादंवि कलम ३२४ आणि बाल अधिनियम कलम २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय होतं प्रकरण?
शिक्षिका नीलम भारमल काही दिवसांपूर्वीच या शाळेत रुजू झाल्या होत्या. त्यांना पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवायचे होते. संबंधित शिक्षिका नीट शिकवू शकत नसून मुलांना विनाकारण शिवीगाळ करत असल्याची तक्रार पालकांनी मुख्याध्यापकांकडे केली होती. अनेक मुलांच्या पालकांनीही मारहाणीचा आरोप केला. पालकांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांनी शिक्षिकेला ताकीद दिली होती. मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतर संतापलेल्या शिक्षिकेने वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा