मुकेश अंबानींपेक्षा श्रीमंत होते ‘हे’ व्यक्ती, ट्रस्टच्या नावावर 12000 कोटी रुपये गमावले; आता आहेत बेघर

Raymond’s Former MD Vijaypat Singhania Was Richest: जेव्हापासून रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्या घटस्फोटाची घोषणा झाली, तेव्हापासून ते चर्चेत आहेत. घटस्फोटाच्या समझोत्याअंतर्गत नवाज मोदींनी सिंघानिया कुटुंबाच्या 11,660 कोटी रुपयांच्या संपत्तीतील 75 टक्के वाटा मागितला आहे. नुकतेच गौतम सिंघानियाचे वडील आणि माजी रेमंड एमडी विजयपत सिंघानिया यांनीही या घटस्फोटाबाबत आपले मत व्यक्त केले. विजयपत सिंघानिया यांनी मुलगा गौतमऐवजी सून नवाजला पाठिंबा दिला आहे.

विजयपत हा रेमंड साम्राज्याचा मालक होता
एक काळ असा होता की विजयपत सिंघानिया संपूर्ण रेमंड साम्राज्य चालवत होते. ते त्या काळात भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. एक काळ असा होता जेव्हा ते मुकेश अंबानींपेक्षा (Mukesh Ambani) श्रीमंत होते, कारण जेव्हा विजयपत रेमंड ग्रुपचे मालक होते तेव्हा अंबानी खूपच लहान होते. पण, त्यांच्या मुलाने त्यांना घराबाहेर हाकलून दिल्याने त्यांच्या नशिबाने कलाटणी घेतली. आज त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे.

मुलाने त्यांना घरातून हाकलून दिले
विजयपत सिंघानिया हे आपले आयुष्य सांभाळण्यासाठी आणि जगण्यासाठी धडपडत आहेत. सिंघानियाने त्यांच्या कंपनीचे सर्व शेअर्स गौतमला हस्तांतरित केले तेव्हापासून हे सर्व सुरू झाले आणि तेव्हापासून त्यांचे नाते तुटायला लागले. विजयपथ सिंघानिया यांनी सांगितले होते की, एकदा जमिनीचा वाद इतका वाढला की गौतमने वडील विजयपथ सिंघानिया यांना घरातून हाकलून दिले.

सुनेला आधार दिला
विजयपत सिंघानिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘मला माहिती आहे की, हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटानंतर पतीच्या संपत्तीपैकी 50 टक्के हिस्सा पत्नीकडे जातो. अगदी सामान्य वकिलालाही हिंदू विवाह कायद्यानुसार हा अधिकार मिळू शकतो. मग तो 75% साठी का लढत आहे? गौतम कधीही हार मानणार नाही कारण त्याचा उद्देश सर्वांना आणि सर्व काही विकत घेणे आहे. त्याने माझ्यासोबतही असेच केले आहे. त्याच्याशी लढण्यासाठी माझ्याकडे इतके पैसे नव्हते. त्याने सर्व काही विकत घेतले. गौतन सर्व काही विकत घेईल, असे भांडून नवाजला काही विशेष मिळेल असे वाटत नाही.’

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा