Salman Khan | मी घाबरत नाही, याने काही फरक पडत नाही… गोळीबार प्रकरणी सलमान खानची पहिली प्रतिक्रिया

Salman Khan Reaction On Firing Outside Galaxy Apartment | बॉलिवूड अभिनेता सलमान खानबद्दल आज मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. पहाटे पाचच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला, असे सांगण्यात येत आहे. सध्या मुंबई पोलीस आणि एटीएसचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, या हल्ल्यावर सलमान खानच्या अत्यंत जवळच्या मित्राची प्रतिक्रिया समोर आली आहे.

टाईम्स नाऊच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार, सलमान खानच्या एका जवळच्या मित्राचे म्हणणे आहे की, भाईजानला त्याच्या आयुष्याची चिंता नाही. त्याला फक्त आपल्या कुटुंबाच्या कल्याणाची काळजी आहे. जवळच्या मित्राने असेही सांगितले की, सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या घटनेनंतर सुरक्षित स्थळी हलणार असल्याचे सांगितले आहे. कुटुंबाची जागा सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

जवळच्या मित्राने पुढे सांगितले की, सलमान खानच्या ‘हम साथ साथ है’ कुटुंबाची खासियत म्हणजे ते खरी भीती दाखवत नाहीत. यामुळेच सलीम साहेब खूप शांत राहतात. मात्र, या गोळीबारानंतर सलीम खान यांची रात्रीची जोप उडाली असेल हेही कुटुंबियांना माहीत आहे. या गोळीबार आणि धमक्यांकडे अधिक लक्ष दिल्यास तो जी भीती निर्माण करू पाहत आहे, ती निर्माण करण्यात तो यशस्वी होत आहे, असे लोकांना वाटेल, असे सलमान खानला (Salman Khan) वाटते. जे काही व्हायचे आहे ते होईल तेव्हा होईल, असा विश्वास सलमानला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल