Prakash Ambedkar | मविआ आणि भाजपला मुस्लिमांची केवळ मते हवी आहेत, पण त्यांना मुस्मिम उमेदवार नकोय

Prakash Ambedkar |आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. ज्यांनी बहिष्कृत समूहांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत व्यापक भूमिका मांडली. भेदाभेद संपवून सर्वांना समतेची वागणूक मिळावी असे अपेक्षित होते. पण आजही प्रस्थापितांच्या डोक्यातील बहिष्काराची भावना संपलेली नाही, असेच दिसते. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि यावर प्रसार माध्यमे देखील गप्प का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीने अद्याप एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीला भाजपप्रमाणे मुस्लिमांना वगळायचे असेल, तर दोघांमध्ये काय फरक आहे?प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घालतात याबाबत प्रसार माध्यमे गप्प का? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपला मुस्लिमांची केवळ मते हवी आहेत, पण त्यांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलेले नाही, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल