‘जर आपण पैशांसाठी चित्रपट बनवणे बंद केले तर…’, Naseeruddin Shah बॉलीवूडवर भडकले

Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह यांचे नाव अशा बॉलीवूड स्टार्समध्ये समाविष्ट आहे ज्यांच्या अभिनयाची संपूर्ण देश प्रशंसा करतो. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह अनेकदा कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेत राहतात. अनेकदा ते चित्रपटांबद्दल आपले मत मांडतात. जवळपास प्रत्येक मुद्द्यावर ते आपलं मत मांडताना दिसतात. तो बॉलिवूड सेलिब्रिटी आणि हिंदी चित्रपटसृष्टीलाही टार्गेट करत असतात. आता अलीकडेच या अभिनेत्याने पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटांवर निशाणा साधला आहे. पैसे कमावण्यासाठी चित्रपट बनवणे बंद केले तरच हिंदी चित्रपटसृष्टीत काहीतरी चांगले घडेल, असे अभिनेते म्हणाले.

काय म्हणाले नसीरुद्दीन शाह?
खरेतर, नसीरुद्दीन शाह यांनी नवी दिल्लीतील ‘मीर की दिल्ली, शाहजहानाबाद: द इव्हॉल्व्हिंग सिटी’मध्ये म्हटले आहे की, “हिंदी चित्रपट निर्माते गेल्या 100 वर्षांपासून एकाच प्रकारचे चित्रपट बनवत आहेत. हिंदी सिनेमा 100 वर्षांचा झाला आहे, पण आम्ही त्याच प्रकारचे चित्रपट बनवत आहोत, हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो, याने माझी निराशा झाली आहे,” असे ते म्हणाले.

अभिनेता पुढे म्हणाला, “मी हिंदी चित्रपट पाहणे बंद केले आहे, मला ते अजिबात आवडत नाहीत. हिंदुस्थानी खाद्यपदार्थ सर्वत्र आवडतात कारण त्यात चव असते. हिंदी चित्रपटांची ताकद काय आहे? भारतीय हिंदी चित्रपट जगभर पाहिले जातात कारण ते त्यांना त्यांच्या घराशी जोडतात, परंतु लवकरच सर्वांना त्याचा कंटाळा येईल.”

आता खूप उशीर झाला आहे
शाह पुढे म्हणाले की, “हिंदी सिनेमांना तेव्हाच आशा आहे जेव्हा आपण त्यांना पैसे कमवण्याचे साधन म्हणून पाहणे बंद करू. पण मला वाटतं आता खूप उशीर झाला आहे. यावर आता उपाय नाही कारण हजारो लोकांनी पाहिलेले चित्रपट बनत राहतील आणि लोक बनवत राहतील. त्यामुळे ज्यांना गंभीर मुद्द्यांवर चित्रपट बनवायचे आहेत, त्यांची जबाबदारी आहे की, आजचे वास्तव दाखवून ते अशा प्रकारे दाखवावे की त्यांना कोटी रुपये मिळू नयेत किंवा ईडी त्यांच्या दारात ठोठावू नये.” ते म्हणाले की, अनेक इराणी चित्रपट निर्मात्यांनी अधिका-यांनी छळ करूनही चित्रपट बनवले. तसेच भारतीय व्यंगचित्रकार आरके लक्ष्मण यांचे उदाहरण देत ते म्हणाले की, आणीबाणीच्या काळातही ते व्यंगचित्रे काढत होते.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं