मुकेश अंबानींच्या कार ड्राइव्हरचा पगार कंपनी मॅनेजरपेक्षाही जास्त! आकडा ऐकून फिरतील डोळे

नवी दिल्ली- भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल तुम्ही खूप वाचले असेल. पण या अब्जाधीश उद्योगपतीच्या ड्रायव्हरच्या पगाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मुकेश अंबानी यांच्या वैयक्तिक ड्रायव्हरचा (Mukesh Ambani Driver Salary) 2017 मध्ये पगार सुमारे 2 लाख रुपये प्रति महिना होता. लाइव्हमिंटच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारे अंबानींच्या ड्रायव्हरचा वार्षिक पगार 24 लाख रुपये आहे. हा पगार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक व्यावसायिकांपेक्षा जास्त आहे. पण मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचे 2023 सालातील सॅलरी पॅकेज काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2017 नंतर त्यात नक्कीच वाढ झाली असेल.

अंबानी कुटुंबातील ड्राइव्हर खासगी कंत्राटी फर्मच्या माध्यमातून कामावर घेतात, असे सांगितले जाते. ड्रायव्हिंग कर्मचार्‍यांना अंबानी कुटुंबाच्या भव्य जीवनशैलीनुसार कठोर प्रशिक्षण देखील दिले जाते. या ड्राइव्हरना अंबानींची बुलेटप्रूफ वाहने चालवावी लागतात. त्यामुळे हे ड्राइव्हर व्यावसायिक आणि लक्झरी वाहने चालवण्यात माहीर असतात. प्रतिकूल परिस्थितीत मार्गक्रमण करण्यात आणि खराब रस्त्यांवर वाहन चालवण्यातही ते पटाईत असतात. माध्यमांतील वृत्तानुसार, अंबानी कुटुंबातील स्वयंपाकी, गार्ड आणि हाउसकीपिंग कर्मचार्‍यांना इतर भत्ते आणि विमा देखील दिला जातो.

इतर सेलिब्रेटींच्या ड्राइव्हरचा पगारही घ्या जाणून
सेलिब्रिटींचे ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड यांचे पगार चर्चेत राहतात. सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) सारखे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्ड्सना करोडोंमध्ये पगार देतात. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा, जो त्याच्यासोबत 20 वर्षांपासून आहे, दरवर्षी 2 कोटी रुपये घेतो. त्याचवेळी करीना कपूर आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या आयाला दरमहा 1.50 लाख रुपये देते.