जगावेगळी लग्नपत्रिका! जबरा फॅनने चक्क लग्नाच्या पत्रिकेवर छापला एमएस धोनीचा फोटो

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल (MS Dhoni) चाहत्यांची क्रेझ कोणापासून लपलेली नाही. अलीकडे एका चाहत्याने क्रेझच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. वास्तविक, त्याने आपल्या लग्नाच्या पत्रिकेवर आपल्या फोटोऐवजी धोनीचा फोटो छापला आहे. याशिवाय त्याचा जर्सी क्रमांकही लिहिला आहे. ही जगावेगळी लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

धोनीचा हा मोठा चाहता छत्तीसगडचा रहिवासी असून त्याचे नाव दीपक पटेल आहे. दीपक लहानपणापासून महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो आणि तो क्रिकेटही खेळतो. दीपक सांगतो की त्याने धोनीला पाहून कर्णधारपदाचे बारकावे शिकले आणि गावातील संघाचे नेतृत्व केले.

दीपकच्या लग्नाची तारीख ७ जून आहे
दीपक लग्न करणार आहे. दीपकने त्याच्या लग्नाच्या कार्डवर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीचा फोटो छापला आहे. यासोबतच जर्सी क्रमांक-7 देखील लिहिले आहे. खरे तर दीपकचा विवाहसुद्धा 7 जून रोजी होणार आहे. दीपकची ही क्रेझ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचवेळी दीपकच्या लग्नाची पत्रिका आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.