गणोशोत्सव येतोय अन् तू गेलीस… आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची आईच्या निधनानंतर भावूक पोस्ट

आयपीएस अधिकारी  कृष्ण प्रकाश यांच्या आईचे निधन

मुंबई – मुंबई आयपीएस अधिकारी  कृष्ण प्रकाश यांच्या आईचे निधन (Krishna Prakash)  झाले आहे. त्याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी आपल्या आईच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत पोस्ट केली आहे.

“आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ बाप्पाची मूर्ती ठेवायचीस. तुझ्या शेवटच्या दिवसातही तू बाप्पाला जवळ ठेवलेस. आता गणपती काही दिवसांवर आले आहेत. अश्यात तू गेलीस. हे सगळं मला अपेक्षित नव्हते. तुझ्याशिवाय मी काहीच नाही”, अशी पोस्ट कृष्ण प्रकाश यांनी फेसबुकवर केली आहे.

दि. 20 ऑगस्ट रोजी त्यांनी तशाच स्वरुपाची एक पोस्ट केली होती. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”, असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले होते. आईशिवाय आम्ही आता भिकारी झालो आहोत, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा कमेंट करत आहेत. त्यांच्या पोस्टने त्यांचे चाहते भावूक झाले आहेत आणि त्यांना समाज माध्यमांवर आधार देत आहेत.