Isro Chief S Somnath | इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना झालाय कर्करोग; ज्या दिवशी आदित्य-एल1 लाँच झाले, त्याच दिवशी समजली धक्कादायक बातमी

Isro Chief S Somnath : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. आदित्य-एल1  (Aditya-L1)प्रक्षेपणाच्या दिवशी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. भारताचे आदित्य-एल1 मोहीम ज्या दिवशी अंतराळात सोडण्यात आली त्याच दिवशी कर्करोग झाल्याचे समजले असल्याचे सोमनाथ यांनी सांगितले. सोमनाथ म्हणाले (Isro Chief S Somnath) की, चांद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपणवेळी काही आरोग्य समस्या होत्या. मात्र, त्यावेळी मला त्याचे स्पष्ट आकलन नव्हते. आदित्य L1 मिशनच्या वेळी आपण कर्करोगाशी झुंज देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या दिवशी आदित्य-L1 मिशन लाँच करण्यात आले. त्या दिवशी सोमनाथ यांना याची माहिती मिळाली. पण त्यांच्या कुटुंबासाठी आणि सहकाऱ्यांसाठीही हा धक्का होता. हे वातावरण त्यांनी स्वतः आणि कुटुंबाने सांभाळले. आदित्य एल-1 लाँच केल्यानंतर त्यांनी कर्करोगाची चाचणी केली. तपासणी व उपचारासाठी चेन्नईला गेले. एस सोमनाथ यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि केमोथेरपी सुरूच होती. हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी धक्का होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

पण आता उपचारानंतर सर्व काही ठीक असल्याने सोमनाथ यांनी सांगितले. मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि औषधोपचार करत आहे. यावेळी कुटुंबीय व कर्मचाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केले. या उपचारांना बराच वेळ लागेल. मला त्याबद्दल स्पष्ट समज नव्हती. तेव्हाच Aditya-L1 लाँच झाला. ज्या दिवशी Aditya-L1 लाँच झाला, मी सकाळी स्कॅन केले. तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या पोटात कर्करोग वाढला होता.

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal