श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या नुकसानीला जय शाह जबाबदार! विश्व विजेत्या कर्णधाराचा गंभीर आरोप

Arjun Ranatunga Allegation On Jay Shah: 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट संघाची (Sri Lanka) कामगिरी अत्यंत खराब होती. यावेळी संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. दरम्यान, विश्वचषकादरम्यान आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला निलंबित केले होते. श्रीलंका क्रिकेट बोर्डात सरकारी हस्तक्षेपानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) हे पाऊल उचलले. या निर्णयानंतर श्रीलंका संघाचा विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा (Arjun Ranatunga) याने बीसीसीआय सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

डेली न्यूजपेपरच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान अर्जुन रणतुंगाने जय शाहवर मोठे आणि गंभीर आरोप केले. रणतुंगा म्हणाले की, ‘जय शाह हे श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवत आहेत. जय शाहच्या दबावामुळे श्रीलंकेचे क्रिकेट बरबाद झाले. जय शाहमुळेच श्रीलंकन ​​क्रिकेट बोर्ड निलंबित झाले. श्रीलंकेचे क्रिकेट अधिकारी आणि जय शाह यांच्यातील संबंधांमुळे श्रीलंकेचे क्रिकेट चिरडले जात आहे. जय शहा केवळ भारताचे गृहमंत्री असलेल्या त्यांच्या वडिलांमुळे शक्तिशाली आहेत.’

रणतुंगाच्या या गंभीर आरोपानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषद श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवत नाही तोपर्यंत श्रीलंकेचा संघ कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. विश्वचषकातील श्रीलंकेच्या सर्व सामन्यांनंतर आयसीसीने ही कारवाई केली ही श्रीलंकेच्या संघासाठी काहीशी दिलासा देणारी बाब आहे.

मात्र, यामुळे श्रीलंकेचे क्रिकेट चाहते खूपच निराश झाले आहेत. हे निलंबन मागे घेण्यासाठी ते सातत्याने आयसीसीकडे आवाहन करत आहे. श्रीलंका संघाच्या विश्वचषकातील कामगिरीवर नजर टाकली तर त्यांनी या स्पर्धेत 9 सामने खेळले, त्यापैकी श्रीलंकेला केवळ 2 सामने जिंकता आले. उर्वरित 7 सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत