जयंत पाटलांच्या मागे लागली ईडीची पिडा; ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले 

Jayant Patil: आयएल आणि एफएस (IL, FS) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीनं  (ED Notice)  दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे.

ईडीने याअगोदर समन्स  बजावत जयंत पाटील यांना  चौकशीसाठी आज (15 मे) हजर राहण्याचे आदेश नोटीसीमधून देण्यात आले होते. मात्र जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावे या बाबतचे पत्र जयंत पाटील यांनी  ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत मागितली होती. अखेर ईडीने त्यांची विनंती मान्य करत 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे.