Kajal Aggarwal | चाहत्याने अभिनेत्री काजल अग्रवालला केला चुकीचा स्पर्श, व्हिडिओत कैद झाले लाजिरवाणे कृत्य

Kajal Aggarwal Viral Video | प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलीकडेच अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक घटना घडली. गर्दीतील एका चाहत्याने तिच्यासोबत असे कृत्य केले की, ते पाहून तुम्हीही संतापून जाल. एका चाहत्याने काजल अग्रवालसोबत केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ समोर आला आहे.

काजल अग्रवालला पाहताच फॅनचा ताबा सुटला
नुकतीच काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) तिच्या वडिलांसोबत हैदराबादमधील एका स्टोअरच्या ग्रँड ओपनिंग सेरेमनीमध्ये पोहोचली होती. तिने वाईन कलरची सुंदर साडी घातली होती ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळीही तिने या कार्यक्रमात अतिशय आत्मविश्वासाने सहभाग घेतला. मात्र त्यानंतर गर्दीतील एका चाहत्याने तिच्याशी गैरवर्तन केले. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अचानक एक चाहता येतो आणि अभिनेत्रीसोबत सेल्फी काढण्याच्या बहाण्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श करू लागतो. फोटो क्लिक करताना या व्यक्तीने अचानक काजल अग्रवालच्या कंबरेवर हात ठेवला.

यानंतर अभिनेत्री खूपच अस्वस्थ झाली आणि तिने लगेचच यावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काजलने फॅनला थांबवून ही काय कृती आहे, अशी विचारणा केली. चाहत्याच्या अशा वागण्याचा तिला रागही आला. पण ही घटना विसरुन ती हसत इतर लोकांशी बोलताना दिसली आणि कार्यक्रम खराब होऊ दिला नाही. पण काजल अग्रवालसोबत घडलेला हा विचित्र क्षण आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्या व्यक्तीवर संतापलेले दिसत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं