सचिनने काशी विश्वनाथ मंदिरात टेकवला माथा; कपिल देव, गावसकर आणि शास्त्रींनीही घेतले महादेवाचे दर्शन

Varanasi Cricket Stadium: वाराणसीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पहिल्यांदा करणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी ‘गॉड ऑफ क्रिकेट’ अर्थात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), कपिल देव (Kapil Dev), सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि इतर माजी क्रिकेटपटूंसोबत वाराणसीला पोहोचला आहे. सचिनने काशी विश्वनाथ मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले, तेथे तो इतर क्रिकेटपटूंसोबत दिसला.

सचिन तेंडुलकरसोबतच टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव, सुनील गावस्कर हेही काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) मंदिरात पोहोचले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सचिन महादेवाची पूजा करताना दिसत आहे. सचिन शिवलिंगावर पुष्पहार अर्पण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सचिनच्या मागे कपिल देव, गावस्कर आणि इतर माजी क्रिकेटपटू दिसत आहेत.

वाराणसीला पोहोचण्याचे एक खास कारण आहे
खरंतर, सचिन तेंडुलकर, कपिल देव, सुनील गावस्कर यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू एका खास कारणासाठी वाराणसीला पोहोचले आहेत. आपल्या लोकसभा मतदारसंघाला अनेक भेटवस्तू देण्यासाठी देशाचे पंतप्रधान आज वाराणसीत पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करणार आहेत. भारताच्या या दिग्गज खेळाडूंना या खास सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’