‘रोहित किंवा विराट कधीच भारताला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकणार नाहीत’, गंभीरचे वादग्रस्त वक्तव्य

Gautam Gambhir On World Cup: भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) त्याच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. अनेकदा तो भारतीय खेळाडू किंवा संघाबद्दल टोकाची विधाने करताना दिसतो. दरम्यान, त्याने पुन्हा एकदा असे वक्तव्य केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. टीम इंडियाने आशिया चषक 2023 जिंकल्यानंतर गौतम गंभीरने म्हटले आहे की, एक गोलंदाजच भारताला आयसीसी वनडे विश्वचषक 2023 ची ट्रॉफी मिळवून देऊ शकतो. म्हणजे ना कर्णधार रोहित शर्मा, ना विराट कोहली भारताला वनडे विश्वचषक जिंकून देऊ शकतात, असे गंभीरने अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया….

गौतम गंभीर, जो आशिया चषकादरम्यान समालोचन पॅनेलचा एक भाग होता, म्हणाला की आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाचे सर्वात घातक खेळाडू गोलंदाज असतील. केवळ गोलंदाजच संघाला स्पर्धा जिंकून देऊ शकतात, असा त्याचा विश्वास आहे. माजी सलामीवीराने दावा केला,

“भारतीय संघाची फलंदाजी खूप मजबूत असेल पण तुमचे फलंदाज सामना जिंकू शकत नाहीत. टीम इंडियाचे फलंदाज विश्वचषक जिंकणार नाहीत कारण कोणत्याही संघासाठी फक्त गोलंदाजच सामना जिंकतील. तुम्ही कितीही धावा केल्या तरी तुम्ही 10 विकेट्स घेऊ शकत नसाल तर सामना जिंकणे कधीही शक्य होणार नाही. भारतात होणा-या आयसीसी विश्वचषकापूर्वी संघाने खूप संघर्ष केला असेल, पण आता सर्व काही आलबेल होताना दिसत आहे. ”

गौतम गंभीरने टीम इंडियाचे तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचे कौतुक केले. गौतम गंभीर म्हणाला,

“टीम इंडियाची गोलंदाजी पहिल्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह आणि सिराज यांनी उत्कृष्ट फॉर्म दाखवला. कुलदीप यादवही अव्वल गोलंदाजी करत आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशिवाय इशान किशनही फलंदाजीची सलामी देण्यासाठी सज्ज आहे. फलंदाजीच्या क्रमवारीतील सर्व नावे निश्चित झाली आहेत, फक्त पाचव्या क्रमांकावर कोण असेल हे निश्चित करणे बाकी आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण