कौतुकास्पद! ‘या’ गावात मुस्लीम बांधवांनी केली गणेशाची आरती; राज्यासमोर ठेवला नवा आदर्श

Ganesh Festival 2023: गणेशोत्सव (Ganeshutsav) हा सण सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात सर्वत्र गणेश मंडळ मोठ्या उत्साहाने गणेशाची स्थापना करतात. दरम्यान संगम गणेश मंडळाने धार्मिक सलोख्याचे आदर्शवत उदाहरण मांडून दिले आहे. सातारा जिल्ह्यातील तांबवे गावातील संगम गणेश मंडळाच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या वतीने (Muslim Community) श्री गणेशाची आरती करण्यात आली.

उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘‘पुसेसावळी (Pusesawali Riots) तांबवे गावापासून खूप दूर नाही. ती घटना व्हायरल झाली. अनेक अफवा उठवल्या. मात्र, पोलिसांनी त्या घटनेचे पडसाद कोठेही उमटू दिले नाहीत. येथे मुस्लीम समाजाच्या वतीने श्री गणेशाच्या आरतीचे नियोजन केले जाते, ही खूप मोठी गोष्ट आहे. ती जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्यासाठी आदर्शवत आहे.’’ या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला