LokSabha Election 2024 | “अस्पृश्यतेविषयी काहीही माहिती नसलेल्या तरुणाला मागासवर्गीय म्हणून तिकीट दिल्याचं दुर्दैव आहे”

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या (LokSabha Election 2024) तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करत मागासवर्गीय म्हणून सोलापूर येथून राम सातपुते (Ram Satpute) यांना तिकीट जाहीर केले. परिणामी सोलापूरमध्ये म्हणजेच प्रणिती शिंदें विरुद्ध राम सातपुते अशी लढत पाहायला मिळेल. दरम्यान मागायवर्गीयांच्या संघर्षाबद्दल जाणीव नसलेल्या व्यक्तीला सोलापुरातून उमेदवारी (LokSabha Election 2024) दिली असल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर टीका केली आहे.

मागच्याच वर्षी एका विषयावरती मी भाषण करत असताना आमदार राम सातपुते ह्यांनी मध्येच उठून काही बोलायला सुरुवात केली. एक वाक्य माझ्या लक्षात आहे. की मी सनातन हिंदू मागासवर्गीय असल्याचा मला अभिमान आहे. बाकी जे काही भाषण त्याचं झालं होतं ते मी इथे लिहित नाही. पण, ह्या तरुणाची अस्पृश्यतेविषयी व त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पुढे त्यांनी म्हटले की, दुर्दैव आहे की ह्या तरुणाला सोलापूर मधून मागासवर्गीय म्हणून तिकीट देण्यात आले आहे. अस्पृश आणि त्याचा संघर्ष माहिती नसलेला उमेदवार देणं हा तमाम अस्पृश्याच्या अस्मितेचा अपमान आहे. सदरचे उमेदवार हे बीजेपेने सोलापूर लोकसभेसाठी दिलेले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय