Kangana Ranaut | ‘वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा अपमान करणे थांबवा, प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र’  

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिची हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी केली आहे. कंगनाच्या नावाच्या घोषणेवर अनेकांची मते समोर येत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाबद्दल काही पोस्ट केले, ज्यानंतर गदारोळ झाला.

आता भारतीय जनता पक्ष कंगनाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर हल्लाबोल करत आहे. वाढता वाद पाहून सुप्रिया यांनी ती पोस्ट डिलीट केली, मात्र भाजप नेते स्क्रिनशॉटच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला करत आहेत. सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाला मंडीतून तिकीट मिळाल्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. कंगनाचा बिकीनीतील फोटो टाकत सुप्रिया यांनी लिहिले, बाजारात आज काय भाव सुरु आहे हे कोणी सांगू शकेल का?  सुप्रियाने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती.

कंगना रणौतची (Kangana Ranaut) प्रतिक्रिया काय?
एक कलाकार म्हणून माझ्या गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या आहेत. ‘क्वीन’मधील एका भोळ्या मुलीपासून ते ‘धाकड’मधील मोहक गुप्तहेरपर्यंत, ‘मणिकर्णिका’तील देवीपासून ‘चंद्रमुखी’तील राक्षसापर्यंत, ‘रज्जो’मधील वेश्येपासून ‘थलाईवी’तील क्रांतिकारक नेत्यापर्यंत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे. तसंच, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा अपमान करणे थांबवले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे, असा पलटवार कंगनाने केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय