IPL 2024 | चेन्नई सुपर किंग्जची विजयी सुरुवात, आरसीबीला ६ विकेट्सने केले पराभूत

आयपीएल 2024 ची (IPL 2024) सुरुवात चेन्नई सुपर किंग्जच्या शानदार विजयाने झाली आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात सीएसकेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. आरसीबीने दिलेले 174 धावांचे लक्ष्य चेन्नईने 18.4 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. चेपॉकच्या मैदानावर 16 वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे आरसीबीचे स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नच राहिले.

रचिन रवींद्रने रंग भरला
174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईची सुरुवात फारशी खास नव्हती. कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात रुतुराज गायकवाड 15 धावा काढून बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेसह रचिन रवींद्रने सीएसकेचा डाव चांगल्या प्रकारे हाताळला. रचिनने पदार्पणाच्या सामन्यातच आपले कौशल्य दाखवत अवघ्या 15 चेंडूत 37 धावा केल्या. या खेळीदरम्यान रचिनने 3 चौकार आणि तब्बल षटकार लगावले. तर रहाणेने 19 चेंडूत 27 धावा केल्या. डेरिल मिशेल 22 धावा करून कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला.

दुबे-जडेजाची महत्त्वपूर्ण भागीदारी
(IPL 2024) प्रभावशाली खेळाडू शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी 11 धावांत रहाणे आणि डॅरिल मिशेलच्या विकेट्स गमावल्यानंतर चेन्नईचा डाव चांगल्या प्रकारे हाताळला. दुबेने हुशारीने फलंदाजी करत 28 चेंडूत 34 धावा केल्या, तर जडेजाने 17 चेंडूत 25 धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी अखंड अर्धशतकी भागीदारी करत चेन्नईला या मोसमातील पहिल्या विजयाची चव चाखवली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज