Manoj Jarange | सरकारने मनोज जरांगे पाटलांना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?

Nana Patole : मराठा आंदोलक (Maratha protestors) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे सरकारकडून जरांगेंची फसवणूक करण्यात आलाचा आरोप केला आहे.

जरांगे पाटील यांची शिंदे सरकारकडून फसवणूक..
मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची सरकारने फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत असे नवी मुंबईत जरांगे यांच्या लाखो कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले. दिलेला शब्द आपण पाळला असेही मुख्यमंत्री म्हणाले. जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या तर मग पुन्हा उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर का आली? सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला असा सवाल आम्ही त्याचवेळी केला होता याची आठवण नाना पटोले यांनी करून दिली.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole