“मनोज जरांगेंनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, संत-फिंत खड्ड्यात गेल्याचे म्हणाले”

Manoj Jarange Patil: राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे या निर्णयाशी खूश नसून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मनोज जरांगेंनी मागणी केली आहे. असे असतानाच आता मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे सोबती अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्या वक्तव्यामुळे मराठा संघटनेत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अजय महाराज बारसकर म्हणाले की, “माझं काम हे सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईन. म्हणून त्यांनी ते पाणी प्यायले नाहीत. संत फिंत गेले खड्यात असं ते म्हणाले. तिथून माझा वाद सुरु झाला.”

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदींसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे.

जरांगेंच्या अनेकांशी गुप्त मीटिंग
23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल