मंदीत ही महाराष्ट्रात अनेक संधी, देशांत 3 महिन्यांत 3 कोटी रोजगार निर्मिती

केंद्र सरकारने देशांतील रोजगार निर्मिती आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत प्रमुख 9 क्षेत्रांत एकूण 3.10 कोटी रोजगार निर्माण झाला आहे. दुसरी लाट येऊन गेली तरी देखील त्यांचा इतकासा परिणाम रोजगार क्षेत्रावर झाला नाही हे विशेष. उत्पादन,बांधकाम,व्यापार, ट्रान्सपोर्ट, शिक्षण,आरोग्य, हॉटेल आणि रेस्टॉरंट,आयटी-बीपीओ आणि वित्तीय सेवा आणि बिगर शेतकी क्षेत्र या 9 क्षेत्रात नवीन रोजगार उपलब्ध झाला आहे.

सर्वाधिक रोजगार निर्मिती ही महाराष्ट्रात, त्या पाठोपाठ हरियाणा, गुजरात,तमिळनाडू, कर्नाटक राज्यात झाली आहे. सध्या देशांत तिसरी लाट सुरू आहे. पहिल्या दोन लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेमध्ये तितक्या प्रमाणात निर्बंध नाहीत. करोना सुरू झाल्यापासून अनेक व्यवसाय बंद पडले. अनेक मोठे व्यवसाय देखील डबगाईला आले. अनेक बँका देखील बुडाल्या त्यामुळे नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील का असा प्रश्न होता. पण  मंदी असून देखील अनेक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

सर्वात महत्वाची गोष्टी  म्हणजे या ज्या नवीन रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्यामध्ये सर्वाधिक नोकरीच्या संधी या 22 ते 25 वयोगटांतील तरुणांना मिळाल्या आहेत. एकूणच काय भारताने कोरोना काळात देखील देशाच्या प्रगतीचा आलेख वाढता ठेवला आहे.