भाजपमध्ये मोदींना पर्याय कोण ? जनता म्हणते हे योग्य वाटतात

जर आज देशांत लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर सरकार कोण बनविणार? भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय कोण? राहुल गांधी यांनी पुढेचे पंतप्रधान व्हावे का? मोदीची तीन अपयशे कोणती, त्यांचे तीन यश कोणते असे प्रश्न इंडिया टूडे सी व्होटरने एक सर्वेक्षण केले आहे.या सर्वेक्षणात सर्व गोष्टी मोदींच्या बाजूनी आहेत असं काही नाही, काही गोष्टी मोदी यांच्या चिंता वाढविणाऱ्या देखील आहेत.

मोदीच्या कामावर किती लोक खुश आहेत हा पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, यातील 59 टक्के लोक मोदी सरकारच्या कामावर समाधानी आहेत तर 26 टक्के लोक मोदी यांच्या कामावर खुश नाहीत. 63 टक्के लोक मोदी यांचे काम चांगले आहे असे म्हणतात तर 15 टक्के लोक सरासरी आहे असे म्हणतात. खराब काम आहे म्हणणारे लोक 21 टक्के इतके आहेत.

पुढचे पंतप्रधान कोण असावेत असा देखील प्रश्न विचारण्यात आला,52. 5 टक्के लोक म्हणतात मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत. तर 6.8 टक्के लोक म्हणतात खासदार राहुल गांधी पुढील पंतप्रधान व्हावेत. 3.5टक्के लोक म्हणतात अमित शहा तर योगी आदित्यनाथ 3.5 टक्के लोक म्हणतात. काही टक्के लोक प्रियंका गांधी यांना देखील पसंती देत आहेत.