‘मिलिंद नार्वेकर म्हणजे तोच का जो मातोश्रीत ‘बॉय’चं काम करायचा’

मुंबई : किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या वादात आता नारायण राणे यांनी देखील उडी घेतली आहे. चुकीच्या कामामुळे घाबरून त्यांना आता घाम फुटला होता, खंर तर हे सांगण्यासाठी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संजय राऊत नारायण राणे यांना काय प्रत्युत्तर देतात, हे पहाणं आता महत्वाचे ठरेल.

नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली.

दरम्यान, 15 फेब्रुवारीला आपण आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला उपस्थित होता. त्यामुळे त्या पत्रकार परिषदेला उत्तर किंवा आमचे मित्र राज्यसभेचे संजय राऊत यांची परिषदेत जी केविलवाणी परिस्थिती झाली होती, जो घाम फुटला होता तो कशामुळे फुटला होता, विरोधकांनी फोडला की चुकीच्या कामामुळे घाबरुन त्यांना घाम फुटला होता, हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आहे, असं बोलत राणेंनी राऊतांची खिल्ली उठवण्याचा प्रयत्न केला.