Muralidhar Mohol | पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील; पंकजा मुंडे यांचा विश्वास

पुणे | पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक शहर आहे. या शहरातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) हे माझे युवा मोर्चातील सहकारी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. म्हणूनच त्यांच्या भेटीसाठी मी येथे खास आली आहे. मोहोळ प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि दिल्लीला जातील, असा विश्वास भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला. ‘पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’, असेही त्या म्हणाल्या.

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या कर्वे रस्त्यावरील २४ तास खुल्या संपर्क कार्यालयाला मुंडे यांनी भेट दिली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे म्हणाल्या ‘आ. मिसाळ या माझ्या मोठ्या भगिनी तर मुरलीधर मोहोळ हे माझे छोटे बंधू असून त्यांची मोठी बहीण म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुण्यात आली आहे. त्यांना मोठा विजय प्राप्त होवो, असेही मुंडे म्हणाल्या.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘मी लोकसभेसाठी आजवर उमेदवार नव्हते, मात्र निवडणूक लढवण्याचा मला अनुभव आहे. वयाच्या १७ व्या वर्षांपासून मी प्रचार करत आहे. मला २२ वर्षांचा राजकारणाचा अनुभव आहे. ही माझी पाचवी निवडणूक आहे. पक्षाने सांगितले तर राज्यभर प्रचार करेन. परंतु, सध्या मी माझ्या निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. मी माझ्या आणि मुरलीधर मोहोळ यांच्याही विजयाविषयी आश्वस्त आहे’

स्व. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत रमल्या पंकजा !

मोहोळ यांच्या २४ तास खुल्या कार्यालयाच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकणारी छायाचित्रे लावली असून यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याही छायाचित्रांचा समावेश यात आहे. त्यातील प्रत्येक फोटोची आठवण मुंडे यांनी जाणून घेतली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात