‘माझ्या आजीच्या सौंदर्यापुढे रश्मिकाही पाणी कम चाय’, वकील गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याची चर्चा

Gunratna Sadavarte On Rashmika Mandhana: वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमी त्यांच्या विचित्र वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठा आरक्षणाला प्रखर विरोध दर्शवला होता. यानंतर आता ते अभिनेत्री रश्मिका मंधाना हिच्या सौंदर्याबद्दल दिलेल्या वक्तव्यामुळे चर्चेचा भाग बनले आहेत.

मराठा आरक्षणावर बोलत असतानाच त्यांनी एका मुलाखतीत त्यांचा आजपर्यंत झालेला प्रवास, राजकारण, समाजकारण आणि वकील म्हणून त्यांनी केलेली वाटचाल याविषयी त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या आजीचीही (grandma) एक आठवण सांगितली आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, माझी आजी रश्मिका मंधानापेक्षाही (Rashmika Mandanna ) सुंदर होती असंही मत त्यांनी व्यक्त केले.

‘माझी आजी इतकी सुंदर होती की, ती रश्मिका मंधाना वगैरे हिरोईन आहेत ना, ती माझ्या आजीसमोर कोणी नाही. पाणी कम चाय, इतकी ब्युटीफुल होती, म्हणजे अगदी रशियन टाईप. उंची सहा फूट, एकदम स्लीम, फेस एकद व्ही कट’ अशा शब्दात त्यांनी आपल्या आजीचे सौंदर्याचे त्यांनी कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘हार्दिकने संघ सोडला, पण सूर्या-बुमराह संघाशी एकनिष्ठ राहिले’, MI बाबत डिव्हिलियर्सचे विधान

CID फेम अभिनेत्रीवर कुटुबियांकडूनच अत्याचार, शरीरावरील जखमा दाखवत मागितली मदत

हार्दिकच्या ‘या’ एका अटीमुळे रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, विश्वचषकापूर्वीच ठरलं होतं सर्वकाही!