Nagpur News | कर्तव्यात कसूर  करणाऱ्या १४ वाहकांचे आयडी बंद; परिवहन विभागाद्वारे कारवाई 

Nagpur News | ‘आपली बस’वर कर्तव्यावर असताना नियमावलीचे भंग केल्याप्रकरणी मे. युनिटी सेक्युरिटी फोर्स व ट्रेनिंग इन्स्टिट्युट नागपूर यांच्या १४ वाहकांची आयडी बंद करण्याची कारवाई नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार परिवहन व्यवस्थापक  महेश धामेचा यांच्याद्वारे ही कारवाई करण्यात आली.

नागपूर (Nagpur News) शहरबस सेवेच्या संचालनाकरीता मे. युनिटी सेक्युरिटी फोर्स व ट्रेनिंग इन्स्टिट्युट नागपूर यांना वाहक पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. एजन्सीद्वारे ‘आपली बस’च्या सेवेकरिता वाहक पुरवठा केला जातो. वाहकांच्या वर्तवणुकीबद्दल मनपाद्वारे एजन्सीला नियमावली देण्यात आली आहे. यामध्ये शहरबस परिचलनाअंतर्गत विना तिकीट प्रवासी वाहून न नेणे, कमी किमतीची तिकीट न देणे, प्रवाश्यांशी सौजन्यपूर्वक वागणूक ठेवणे, कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर न करणे या बाबींचा समावेश आहे. वाहकांनी उपरोक्त नियमावलीचे पालन करणे बंधनकारक देखील आहे.

मात्र काही वाहकांद्वारे नियमावलीचा भंग केला जात असल्याचे निदर्शनास आले. वाहकांद्वारे विना तिकीट प्रवाशी वाहून नेणे, कमी किंमतीची तिकीट देणे, प्रवाश्यांशी अयोग्य वर्तवणूक, कर्तव्यावर मोबाईलचा वापर करणे, अशा अनेक गैरवर्तवणूक करण्यात आल्या. संबंधित वाहकांवर परिवहन विभागाद्वारे कारवाई करून त्यांचे आयडी बंद करण्यात आले आहेत. यापुढे देखील कुठल्याही वाहकांचे अशाप्रकारचे वर्तन आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाद्वारे देण्यात आलेला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला