नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता – धनंजय मुंडे

Dhananjay Munde – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही राज्य शासनाची जागतिक बँक अर्थ साहाय्यितअत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्याद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचे नियोजन शासन करत असताना या योजनेचा गैरफायदा घेऊन कोणी कोणत्याही प्रकारची फसवणूक करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर शंभर टक्के कार्यवाही करून चुकीचे अनुदान लाटलेल्यांकडून सक्त वसुली करण्यात येईल, अशी ग्वाही आज विधानपरिषदेत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

अकोला जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत औजारे व ट्रॅक्टर वाटपाच्या संदर्भात गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अमोल मिटकरी आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती, त्याच्या उत्तरादाखल धनंजय मुंडे बोलत होते.

अकोला जिल्ह्यात सदर योजनेतून ट्रॅक्टर व औजारे खरेदीच्या अनुदानासंदर्भात ज्या तक्रारी आल्या आहेत, त्याचा तपास सखोल पद्धतीने करण्यात येत असून, यातील दोषींवर सक्तवसुलीसह आवश्यकता भासल्यास पोलीस तक्रार देखील करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास आता योजनेचे स्वरूप देण्यात येणार असून, आजवर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली येण्यास तसेच समूह शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यास ही योजना मार्गदर्शक ठरली आहे. या योजनेचा दुसरा टप्पा लवकरच कार्यान्वित करणार येणार असल्याची माहिती, उपस्थित लक्षवेधीच्या माध्यमातून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-