राज ठाकरेंच्या भाषणामुळे नारायण राणेंना गुदगुल्या; म्हणाले, …

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आरसा दाखवल्याने महाविकास आघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षांनी राज यांच्या भाषणावर सडकून टीका करायला सुरुवात केली असताना भाजप मात्र राज यांच्या पाठींब्यासाठी धावून आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरेंचं कौतुक करत त्यांच्यावर टीका करणाऱ्या नेत्यांना सुनावलं आहे.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. महाराष्ट्रातलं वास्तववादी चित्र त्यांनी सांगितलं जे काही जणांना झोंबलं. ज्यांनी आयुष्यभर स्वार्थीपणाने आणि सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रीया द्यावी हे ही आश्चर्य आहे, असं राणे म्हणाले. पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे.असं देखील ते म्हणाले.