दाऊदचा फोटो विधानभवनात झळकावणाऱ्या भाजपचा राष्ट्रवादीने केला निषेध

मुंबई : आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा फोटो विधानभवनात झळकवणाऱ्या भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी जाहीर निषेध केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने बेकायदेशीर कारवाई केली आहे. मात्र भाजप याचा वेगळा अर्थ काढून वातावरण निर्माण करत आहे.

दरम्यान आज कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा फोटो भाजपने विधानभवनात झळकवण्याचा प्रयत्न केल्याने भाजपविषयी तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यावर क्लाईड क्रास्टो यांनी भाजपचा निषेध केला आहे.