विकासकामे आणि संघटना वाढीच्या कामांमुळे एकत्रित बैठक घेण्याचा निर्णय, सुनिल तटकरे यांची माहिती

Sunil Tatkare – मतदारसंघात रखडलेल्या विकासकामांसंदर्भात आम्ही निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यात एकत्रितरीत्या विधानसभा, विधानपरिषद सदस्य जमलो नव्हतो. त्यामुळे एका बाजूला विकासकामे व दुसऱ्या बाजूला संघटना वाढीचे काम या गोष्टीचा विचार करून दर मंगळवारी मी, प्रफुल पटेल, आमदार, मंत्री एकत्रित बैठक घ्यायची ठरवले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatakre) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आम्ही आमची स्पष्ट भूमिका निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. तशाच प्रकारची भूमिका ट्वीटर हँडलकडेही दाखल करणार आहोत असा स्पष्ट खुलासा माध्यमातून येत असलेल्या बातम्यांवर बोलताना सुनिल तटकरे यांनी केला.

मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाबाबत जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर संवेदनशील सरकार योग्य व न्यायिक पध्दतीने सर्वांना न्याय कसा देता येईल असा प्रयत्न करेल असेही सुनिल तटकरे म्हणाले.

https://youtube.com/shorts/Tn13poRRNl4?si=Fnp7msXQ_47fDZ0H

महत्त्वाच्या बातम्या-

Ajit Pawar गटाला ट्विटरचा मोठा दणका, Sharad Pawar गटाने तक्रार केली होती

भारतीय संघाच्या नावावर लज्जास्पद विक्रम, श्रीलंकेविरोधात जिंकूनही टीम इंडियाचा झाला अपमान!

दोन बिस्किटे दिल्यावर चावणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव; भाजप नेत्याने दिली जुन्या वक्तव्याची आठवण करून