हे साले इतरांचे दाखले देतात पण चोरी चकारी आणि आंबट विषयांमध्ये स्वतः बरबटलेले आहेत – राणे 

मुंबई – खासदार संजय राऊतांचे (Sanjay Raut) अत्यंत निकटवर्तीय सुजीत पाटकरांना (Sujit Patkar) अटक केल्याची माहिती मिळत आहे. BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई केली आहे.(BMC Covid Scam Case).  खासदार संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पाटकर यांना आता कोर्टात हजर केलं जाणार असल्याची शक्यता आहे.

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत अनेक ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेकडून कोविड सेंटर्सचे कॉन्ट्रॅक्ट पात्रता नसलेल्या लोकांना देण्यात आले होते. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, जेवढ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले आहेत. त्या कोणत्याही कंपन्या अनुभवी नव्हत्या. तसेच, त्या कोवि़च्या काही काळापूर्वीच स्थापन झाल्या होत्या. अनेक नियम डावलून या कंपन्यांना महापालिकेच्या वतीनं कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले होते.

दरम्यान, या कारवाई नंतर आता माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सुजित पाटकर आत गेला आता मिसेस पाटकर यांनी पोलिसांकडे संजय राऊत विरोधात harassment ची तक्रार केली आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे, हे साले इतरांचे दाखले देतात पण चोरी चकारी आणि आंबट विषयांमध्ये स्वतः बरबटलेले आहेत. अशी टीका राणे यांनी केली आहे.