Ajit Pawar | छत्रपती संभाजी महाराज एकही ‘निवडणूक’ हरले नव्हते, भाषणावेळी अजित पवारांची घोडचूक

Ajit Pawar – लवकरच लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections) तारिख जाहीर होणार असल्याचे सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील लोकसभेसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. दरम्यान लोकसभेचे वारे डोक्यात असल्याने अजित पवारांच्या हातून मोठी घोडचूक घडल्याचे दिसून आले.

शनिवारी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या परिसरातील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी भाषण करताना अजित पवार यांनी एक घोडचूक केली. अजित पवार भाषणावेळी संभाजी महाराजांची प्रशंसा करत होते. तेव्हा भाषणाच्या ओघात अजित पवार यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या आयुष्यात एकही ‘निवडणूक’ हरले नाहीत. खरंतर संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) एकही लढाई हरले नाहीत, असे अजितदादांना म्हणायचे होते. परंतु, भाषणाच्या ओघात त्यांच्या तोंडातून लढाईऐवजी निवडणूक हा शब्द निघाला. त्यावेळी व्यासपीठावर बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच अजित पवार यांना चूक लक्षात आणून दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर अजित पवार यांनी लगेच झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे त्याशिवाय दुसरं काही सूचत नाही. पण आमच्यातील देवेंद्र फडणवीस हे निष्णात आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे लक्षात आणून देतात. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल अजित पवारांनी फडणवीसांचे आभारही मानले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’