आता माझे शेवटचे दिवस उरलेत, मुलाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं; अजितदादांच्या आईने स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री (Ajit Pawar Chief Minister) बनण्याची इच्छा कुणापासून लपलेली नाही. आता अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी दादांना लवकरात लवकर मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बारामतीतील काटेवाडी ग्रामपंचायतीत मतदान केल्यानंतर माध्यमांशी आशा पवार (Asha Pawar) बोलत होत्या.

काटेवाडीत अजित पवार गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत. अजित पवार अजूनही डेंग्यूतून पूर्णपणे सावरले नसल्याने ते मतदानाला अनुपस्थित राहिले. परंतु त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आई आशा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आशा पवार म्हणाल्या, “दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं, असे वाटते. दादावर लोकांचं प्रेम आहे, पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की, दादाने मुख्यमंत्री व्हावे. आता शेवटच आहे, मी आता ८६ वर्षांची आहे. त्यामुळे माझ्यादेखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. कोणास ठाऊक इच्छा पूर्ण होईल की नाही. लोकांचं काय सांगता येतं?”, असे आशाताई पवार यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण