Viral Video: “नज़रें मिलते ही नज़रों से, नज़रों को चुराए…”; देवेंद्र फडणवीसांनी गायलं श्रीवल्ली

Devendra Fadnavis Singing Srivalli Song: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओ चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असतात. परंतु राजकारणात आपला ठसा उमटवणारे देवेंद्र फडणवीस यांना गाणे गाताना पाहण्याचा योग फार क्वचितच आला असावा. आता खुद्द देवेंद्र फडणवीस गाणे गाताना कॅमेरात कैद झाले आहेत. त्यातही त्यांनी असे तसे नव्हे तर, प्रसिद्ध दाक्षिणात्य सिनेमातील श्रीवल्ली हे गाणे गायले आहे. त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओत दिसते की, जावेद अली यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस श्रीवल्ली हे गाणं गात आहेत. जावेद अली गाण्याचे सुरुवातीचे बोल गातो आणि देवेंद्र फडणवीस पुढील ओळी पूर्ण करतात. फडणवीसांना गाणे गाताना पाहून प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा गजर सुरू होतो.

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण