पुण्यात PSIने ड्रीम ११ वर दीड कोटी रुपये जिंकले, पण आता अडचणी वाढणार; नेमकं काय घडलं?

Somnath Jhende Dream Xi: भारतात सध्या वनडे विश्वचषक २०२३ चे (ODI World Cup 2023) सामने सुरू आहेत. विश्वचषकादरम्यान क्रिकेट चाहते त्यांचा अधिकतर वेळ ड्रीम इलेव्हनवर घालवताना दिसतात. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (Pune Police Sub Inspector) पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनीही ड्रीम ११ वर (Dream 11) आपले नशीब आजमावले आणि त्यांनी चक्क दीड कोटी जिंकले. मात्र या ऑनलाईन गेममधून इतकी मोठी राशी जिंकल्यानंतर झेंडे अडचणीत सापडले आहेत. तसे कसे? पाहूया.

झेंडे यांनी बांगलादेश आणि इंग्लंड (BAN vs ENG) यांच्यात झालेल्या सामन्यासाठी ड्रीम इलेव्हनवर (BAN vs ENG Dream XI) टीम लावली होती. सामना संपल्यानंतर सोमनाथ झेंडे यांनी त्यांचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दीड कोटी जिंकल्यानंतर सब इन्सपेक्टर करोडपती झाले आहेत, त्यामुळे त्यांचं कुटुंबही खूश झालं आहे. तरीही ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचं झेंडे यांनी सांगितलं. अशा गेम्सपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे, कारण याचं व्यसन लागून आर्थिक नुकसानही होऊ शकतं, असं आवाहन झेंडे यांनी केलं आहे.

झेंडे यांनी दीड कोटी रुपये जिंकल्यानंतर भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या असून संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन