The Kashmir Files वादात प्रकाश राज यांची उडी; म्हणाले,निर्लज्जपणा अधिकृत झालाय

Mumbai – गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चा निरोप समारंभ पार काल ( २८ नोव्हेंबर ) पार पडला. मात्र, हा निरोप समारंभ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या समारंभात बोलताना मुख्य ज्युरी नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली. हा चित्रपट ‘व्हल्गर’ ( अश्लिल ) आणि ‘प्रोपगंडा’ ( प्रचारकी ) असल्याचं मत नदव लॅपिड यांनी मांडलं. यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान,  प्रकाश राज यांनी या घटनेसंदर्भातील बातमी शेअर करत ट्वीट केले. प्रकाश राज म्हणतात की, ‘निर्लज्जपणा आता अधिकृत झाला आहे. द कश्मीर फाइल्स’च्या निर्मात्यांवर प्रकाश राज यांनी आधीच संताप व्यक्त केला होता. आज लॅपिड यांच्या टिप्पणीनंतर त्यांनी पुन्हा हा मुद्दा उचलून धरला आहे.